होमपेज › Konkan › आंबोली : गोवा बनावटीच्या दारुसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबोली : गोवा बनावटीच्या दारुसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Dec 10 2017 3:18PM | Last Updated: Dec 10 2017 3:18PM

बुकमार्क करा

आंबोली : प्रतिनिधी

आंबोली येथे तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारुसह पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आज सकाळी साडे सातच्या सुमारास गोवा बनावटीची २४ हजार रूपये किमतीची दारू आणि जी ए ०८ आर ५६२८ नंबरची टाटा इंडीका कार असा पावणेदोन लाख  किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या घटनेतील संशयित आरोपी सागर राजू  पाटील (रा.निपाणी) याला पकडण्यात आले. तो पोलिसांना चकवा देऊन महादेव गड रस्त्याने जाऱ्याच्या प्रयत्नात होता. आंबोली पोलीस हे.कॉ.विश्वास सावंत,कॉ.गुरुदास तेली व आदीनी  कारवाई केली.