Thu, Feb 21, 2019 07:05होमपेज › Konkan › ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा सिंधुदुर्गलाही!

ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा सिंधुदुर्गलाही!

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 11:04PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तापमान 41 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसल्याचे जाणकारांचे मत आहे. विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे कोकणातही तापमानाचा पारा चढत चालला आहे. 

घामाच्या धारा वाहत आहेत, इतके तापमान वाढले आहे. मध्यंतरी काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत गारवा पसरला होता. पण, गेले आठ-दहा दिवस सूर्य आग ओकत आहे. वृक्षतोडीचा परिणाम म्हणून तापमान वाढत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या आठवड्यात सुरुवातीला 35 ते 37 अंश सेल्सिअर इतके तापमान होते. मात्र, आता ते 41 वर पोहोचले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नसराई सुरू झाली आहे. बाजारपेठांमधील ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. याचा दुष्परिणाम म्हणून पाण्याची पातळी वेगाने खाली येत आहे. परिणामी, पाणीटंचाई तीव्र बनत चालली आहे. आजही शाळांना सुट्टी पडलेली नाही. प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक दिसतात, पण विद्यार्थ्यांची संख्या वाढत्या तापमानामुळे घटली आहे.