Sat, Apr 20, 2019 18:04होमपेज › Konkan › तरूणीची मेसेजवर छेडछाड; एकावर गुन्हा दाखल

तरूणीची मेसेजवर छेडछाड; एकावर गुन्हा दाखल

Published On: Apr 11 2018 2:01PM | Last Updated: Apr 11 2018 2:01PMमहाड : प्रतिनिधी

महाड शहरात राहणाऱ्या सतरा वर्षीय तरुणीच्या मोबाइलवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला मेसेज पाठवून माझ्यावर प्रेम कर नाही तर मी जीव देइन अशी धमकी देणाऱ्या आणि तिचे खोटे अकाऊंट तयार करणाऱ्या  तरुणाविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे .  

याबाबात मिळालेल्या माहितीनुसार , खाडीपट्ट्यात राहणाऱ्या बुरान झमाने (पूर्ण नाव गाव समजू शकले नाही) नावाच्या तरुणाने १८ मार्च  ते १०  एप्रिल  या काळात संबंधित तरुणीच्या मोबाइलवर फोन करुन त्राव दिला. तसेच आपल्या घरातील फोनवरून माझ्यासोबत प्रेम कर नाहीतर मी जीव  देतो व मी मेलो तर त्याला तू जबाबदार रहाशील अशी धमकी दिली. तसेच सारखे फोन करून भेटायला ये असा तगादा लावला. त्याचप्रमाणे पीडित तरुणीच्या नावाने खोटे अकाऊंट तयार केले. त्यावर प्रोफाइलला इंस्टाग्राम  फोटो ठेवून सर्व माहिती व्हायरल करेन अशी धमकी दिली होती . 

यानंतर काल (मंगळवार दि. १० एप्रिल) ला पीडित तरुणीने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित तरुण बुरान झमाने यांच्या विरोधात भा.द.वि. ३५४,३५४(५),५०७ यासह बालकाचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ ११(४)आय टी २००० कलम ६६ क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे करीत आहेत.

Tags : Girl, Harrassment, Message, Boy, Police, Mahad