Mon, May 20, 2019 08:33होमपेज › Konkan › मालवण-हडी येथे गौतम बुद्ध जयंती साजरी

मालवण-हडी येथे गौतम बुद्ध जयंती साजरी

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 9:31PMमालवण :  वार्ताहर 

मालवण- हडी येथील बौद्ध हितवर्धक मंडळ मुलखी शाखा आणि सावित्री बाई फुले महिला मंडळ हडी यांच्या संयुक्‍त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यता आली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण,त्यांचे महानकार्य प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. यासाठी सर्व धम्म बांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा रंजना कदम यांनी केले.हडी बौद्ध हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष भिकाजी कदम, उपाध्यक्ष महेंद्र कदम,अनिल कदम, सावित्री बाई फुले मंडळाच्या अध्यक्षा रेखा कदम, आरती कदम,आदी उपस्थित होते. यावेळी गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना सायली कदम, अंकिता कदम, सोनल कदम, बबिता कदम, आरती कदम, अनिल कदम यांनी विविध कथांच्या माध्यमातून गौतम बुद्धांविषयी माहिती दिली. 

यावेळी मंडळाच्यावतीने 18 एप्रिल ते 13 मे या कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात गाव मर्यादित निबंध स्पर्धा,वक्‍तृत्त्व स्पर्धा, फनीगेम्स, पाक कला आदी स्पर्धा घेण्यात आल्या. लहान मुलांच्या  वक्‍तृत्त्व स्पर्धेत अर्णव कदम प्रथम-शुभम कदम, द्वितीय-साक्षी कदम, तृतीय-स्वरा कदम  हिने उत्तेजनार्थ  क्रमांक पटकाविले. तर वैदेही कदम,सुयश कदम,यश  कदम यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला.

Tags : Konkan, Gautam Buddha, Jayanti, celebrated