Fri, Jul 19, 2019 20:23होमपेज › Konkan › आंबेली परिसरात गवारेड्यांचा धुडगूस

आंबेली परिसरात गवारेड्यांचा धुडगूस

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:33PM

बुकमार्क करा
दोडामार्ग : वार्ताहर 
     

आंबेली परिसरात  काही  दिवसापासून  गावरेड्यांच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घामला आहे.  या गव्यांकडून उन्हाळी शेती  बरोबरच   काजू बागायतींचेही अतोनात नुकसान सुरू आहे. मंगळवारी रात्री येथील  रवींद्र रेडकर, केशव रेडकर, राजा सावंत यांच्या काजू बागेतील पंधरा ते वीस काजू कलमे गव्यारेड्यांनी जामिनदोस्त केली. वनविभागाने  पंचनामा करून  नुकसानभरपाई  द्यावी तसेच  गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.  
पावसाळी शेती कापणीनंतर  या परिसरातून गवे गायब झाले होते.

यामुळे शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता.  आता उन्हाळी शेती बहरत असताना गव्यांचा कळप पुन्हा या परिसरात परतल्याने शेतकरी हवालदील झाला आहे .  येथील जंगल परिसरात गेल्या कही दिवसांपासून गव्यांचा वावर दिसून येत आहे.   दिवस भर जंगलात राहून रात्री  हा कळप उन्हाळी शेती तसेच  काजू बागायतींमध्ये घुसून पिकांचे   नुकसान करत आहे. या   काळपात सुमारे दहा ते पंधरा गव्यारेड्यांचा समावेश आहे. सध्या  काजू बागांध्ये साफसफाईची तसेच कीटकनाशक फावरणी कामे सुरु आहेत.

भर दिवसा काजू बाबांमधून गव्यांचा कळप मुक्‍त संचार करत असल्याने शेतकर्‍यांना शेती- बागायतींमध्ये काम करणे  कठीण बनले आहे.   मंगळवारी  मध्यरात्री  आंबेली- कोनाळ कर वाडी येथील शेतकर्‍यांच्या काजू बागायतींचे गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वनविभागाने वेळीच लक्ष देत नुकसानीचा पंचनामा करून  गव्यारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली  आहे .