Thu, May 23, 2019 14:57
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › जीएसटी वसुलीत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

जीएसटी वसुलीत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:00PMओरोस : प्रतिनिधी

‘एक देश एक कर’ जीएसटी कर प्रणालीच्या वर्षपूर्तीत 20 कोटी 41 लाख 18 हजार 391 महसूल जीएसटीच्या माध्यमातून जिल्ह्यात जमा झाला आहे. नवीन करप्रणाली आत्मसात करून राज्यात अव्वल यश मिळविल्याचे जीएसटी राज्यकर आस्थापना अधिकारी अंजली धोपेश्‍वररकर यांनी वर्षपूर्ती समारंभात केली. 

सिंधुदुर्गनगरी येथे व्यवसाय विक्रीकर जीएसटी कर आयुक्त कार्यालयात जीएसटी वर्षपूर्ती समारंभ आस्थापना अधिकारी अंजली धोपेश्‍वरकर, राज्य कर अधिकारी दिनेश सावंत, ए. एस. वारगायचोर, व्यवसाय कर अधिकारी राजकुमार सागरे, नितीन तायशेटे, नितीन वाळके, अरविंद नेवाळकर, राजू जांभेकर यांच्यासह व्यापारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 या 9 महिन्यांत 20 कोटी 41 लाख 18 हजार 391 महसूल जीएसटी माध्यमातून जमा झाला. या 20 कोटींच्या कर प्रणालीत 8 कोटी 58 लाख 26 हजार 47 राज्य कर, 7 कोटी 70 लाख 65 हजार 334 केंद्रीय कर, 4 कोटी 6 लाख 44 हजार 651 आंतरराज्य कर, 6 लाख 5 हजार 759 शैक्षणिक कर जमा झाल्याचे श्रीमती धोपेश्‍वर यांनी सांगत जीएसटीचा वर्षपूर्ती वाढदिवस साजरा करतो, एक देश एक कर या संकल्पनेतून देशात वस्तू व सहकाराची अंमलबजावणी सुरू झाली. नवीन करप्रणाली अनुप्रणालीची पध्दत आत्मसाथ करून करदात्यांशी योग्य जीएसटी कर असल्याचे दाखवून राज्यात अव्वल यश मिळविले आहे. यावेळी वस्तू व सेवा कराची विवरण पत्रे भरून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.