होमपेज › Konkan › कणकवली नगरपंचायतीच्या कचरा गाड्यांना जी.पी.एस.सिस्टिम 

कणकवली नगरपंचायतीच्या कचरा गाड्यांना जी.पी.एस.सिस्टिम 

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:05PM

बुकमार्क करा

कणकवली : शहर वार्ताहर

स्वच्छ सर्वेक्षण 2018 कार्यक्रम प्रभावीपणे राबवत असतानाच कणकवली नगरपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत आपल्या सर्व कचरा घेणार्‍या वाहनांना जी.पी.एस.सिस्टिम बसवली आहे.ज्यामुळे कुठची गाडी कुठे आहे, कितीवेळ आहे, कोणत्या मार्गावर आहे हे नगरपंचायतला ट्रॅकिंग सिस्टिवर समजण्यास मदत होणार आहे.तसेच  कचरा उचलणे व व्यवस्थापन करणे सोपं होणार आहे.

कणकवली नगरपंचायत येथे स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 कार्यक्रमाची एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा गुरुवारी घेण्यात आली यावेळी  नगरपालिका विभाग-कोकण भवनचे उपसंचालक सुधाकर जगताप यांनी न पं च्या कचरा गाड्यांना जी.पी.एस सिस्टिम बसविण्याच्या सूचना केल्या होत्या.त्याची तत्काळ अंमलबजावणी कणकवली न पं कडून करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 ला शहरात  नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत असून ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करण्यावर ही जास्त भर दिला जात आहे.