Mon, May 20, 2019 22:29होमपेज › Konkan › रेशन वितरणावर ‘जीपीएस’ नजर

रेशन वितरणावर ‘जीपीएस’ नजर

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:26PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रेशनच्या धान्याची वाहतूक करताना होणारा गोलमाल रोखण्यासाठी ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येऊन धान्याचे वितरण थेट दुकानात होणार आहे.

रेशन दुकानांवर विविध योजनांतर्गत धान्य वितरण करताना काही कोट्यामधील धान्य अन्य ठिकाणी वळविले जात असल्याचे पुरवठा विभागाच्या निदशर्र्नास आले होते. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या कोट्याचे धान्य परस्पर लांबविण्याचे प्रकार घडत होते. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता पुरवठा विभागाने धान्य वितरण प्रणालीत जीपीएस तंत्राचा वापर सुरू केला आहे. 

या तंत्राद्वारे धान्यपुरवठा करणार्‍या वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे धान्याचे वितरण देलेल्या निर्देशाप्रमाणे होत असल्याचे ऑनलाईन तपासले जाणार आहे. यामध्ये बेशिस्ती आढळल्यास त्या पुरवठादारावर कारवाई करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पिवळे कार्डधारकांच्या कोट्यातील केरोसिनवर ही नजर राहणार आहे.