Mon, Aug 19, 2019 00:53होमपेज › Konkan › छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून वाद हे दुर्दैव : आ. नितेश राणे

छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून वाद हे दुर्दैव : आ. नितेश राणे

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:37PM

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

इतिहास अभ्यासकांच्या समितीने आठ वर्षे संशोधन केल्यानंतर 19 फेब्रुवारी ही तारीख छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी केली जाते. असे असताना शिवसेनेच्या आमदारांनी तिथीप्रमाणे शिव जयंती साजरी करण्याची केलेली मागणी ही दुर्दैवी आहे. शिव जयंती तिथीनुसार साजरी करण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे या विषयात जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आ. नितेश राणे यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या एका आमदाराने छ. शिवाजी महाराज यांची जयंती 8 एप्रिलला साजरी करावी, अशी मागणी केली. 

शिवजयंतीची अधिकृत तारीख 19 फेब्रुवारी

शिवजयंतीची मागणी सरकारविरोधी आहे, शिवजयंतीची अधिकृत तारीख 19 फेब्रुवारी आहे. सभागृहात यावरून वाद निर्माण करत शिवसेना सदस्यांनी एक नवीन मागणी पुढे आणली आहे. सिंधुदुर्गातील शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी याविषयी आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. ते शिवजयंती 19 फेब्रुवारीला की तिथीनुसार करणार आहेत हे जाहीर व्हायला हवे. जर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार करणार असाल तर पक्षप्रमुखांचा वाढदिवसही तिथीनुसार करणार का? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे आ. नितेश राणे यांनी सांगितले.

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या तारखा यापूर्वी खा.विनायक राऊत यांनी जाहीर केल्या होत्या. आता पुन्हा पालकमंत्र्यांनी जून 2018 मध्ये विमानतळाचे उद्घाटन होईल, असे जाहीर केले आहे.  मात्र, विमानतळाचे उद्घाटन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री होतील तेव्हाच होईल. ते पालकमंत्री झाल्याचे जेव्हा जाहीर होईल तेव्हाच विमान उड्डान घेईल,असे आ. नितेश राणे यांनी सांगितले.

विखे-पाटील कधीही भाजपात जातील?

आ. नितेश राणे व आ. कोळंबकर यांच्यावर कारवाई करणार या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता आ. राणे म्हणाले, विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर प्रतिक्रिया देताना मी कुणाला मतदान केले हे जगजाहीर आहे, याचा अर्थ मी काँग्रेसला मतदान न करता प्रसाद लाड यांना मतदान केले असे होते का? जगजाहीर शब्दाचा अर्थ त्यांनी सांगावा. विखे-पाटील यांना विरोधी पक्षनेते पदात रस राहिलेला नाही. ते कधीही भाजपात येवू शकतात, अशी परिस्थिती आहे. माझ्या निमित्ताने त्यांना पद सोडायचे असल्यास मी काय करणार? अहमदनगरच्या एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसपेक्षा भाजपवाले जवळचे वाटतात, असे वक्तव्य केले होते. मग त्यांच्यावरही पक्ष कारवाई नको काय? असा उलट सवाल आ.राणे यांनी केला.