होमपेज › Konkan › पोषण आहार स्वयंपाकी संघटनेचा जि.प.वर मोर्चा

पोषण आहार स्वयंपाकी संघटनेचा जि.प.वर मोर्चा

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:32PMओरोस : प्रतिनिधी

शालेय पोषण आहार शिजवून देणारे बचत गट, स्वयंपाकी यांना वाढत्या महागाईत काम करणे गैरसोयीचे होत आहे. यासाठी स्वयंपाकीचे मानधन वाढविण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ शनिवारी शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघटनेने जि. प. वर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ओरोस रवळनाथ मंदिर ते जि. प. भवन असा हा मोर्चा शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्या अध्यक्ष कमलाताई परूळेकर, उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी प्रियांका देवळी, अनुराधा नरसाळे, प्रियांका सरमळकर, भारती परब, श्रेया सावंत,  प्रियांका ठुकरूल, अस्मिता मेस्त्री, रूपाली वाळके, मंजुषा कदम आदींसह शेकडो स्वयंपाकी मोर्चात सहभागी झाले होते.

संघटनेने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजवून देणार्‍या स्वयंपाकींचे प्रश्‍न सोडवावे, मानधनात तीन पट वाढ करावी,  जि. प. कडे मानधन व इंधन आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.