Thu, Apr 25, 2019 12:26होमपेज › Konkan › आजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’

आजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:30AMदेवगड : प्रतिनिधी

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित अन्नपूर्णा लोकसंचलीत साधन केंद्र,देवगड आणि दिर्बा-रामेश्‍वर ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने रविवार 6 ते 15 मे या कालावधीत ‘देवगड महोत्सव 2018’ हापूस होम्सजवळील पाटणकर कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात हापूस आंबा व कृषी प्रदर्शन-विक्री, बचतगटांना बाजारपेठ तसेच पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.महोत्सवाचे उद्घाटन रविवार  6 मे रोजी सायं. 4 वा. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ.संजय भावे यांच्या हस्ते होणार आहे.तर सायं. 7 वा.सदानंद वेलणकर प्रस्तुत ‘स्वर संध्या’ हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार 7 मे रोजी सायं.7 वा.बुवा आनंद जोशी (नाडण) व बुवा चंद्रकांत तिर्लोटकर(सडे वाघोटण) यांच्यामध्ये डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. 8 मे रोजी सायं. 7 वा. दशावतारी नाट्यप्रयोग व विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम,  9 मे रोजी सायं.7 वा. जिल्हास्तरीय फुगडी नृत्य स्पर्धा,  10 मे रोजी सायं.7 वा.तालुकास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा, 11 मे रोजी सायं. 7 वा.जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धा होणार आहे. 12 मे रोजी सायं.5 वा.कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

यामध्ये सुवर्ण कोकण संस्थापक सतिश परब यांचे विविध जातीचे आंबे, काजू, नारळ व इतर फळांचे प्रदर्शन व लागवडीसाठी मार्गदर्शन, पिंजरा मत्स्यशेती प्रक्रिया, शोभिवंत मासे, शेळीपालन, कुक्कूटपालन प्रदर्शन व त्याचे उद्योग यावर मार्गदर्शन होणार आहे.13 मे रोजी सायं.5 वा.शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शस्त्रे संग्राहक गिरीश  जाधव यांच्या संग्रहातील अस्सल, दुर्मिळ व जुनी शस्त्रे यांचे प्रदर्शन होणार आहे.त्यानंतर सायं.7 वा.जादूगार अवधुत कलामंच चिपळूण प्रस्तुत सुपरहिट मॅजिक शो, मिमिक्री व लावणी नृत्याचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. 14 मे रोजी सायं. 5 वा.ज्येष्ठ नागरिकांसाठी फनी गेम्स स्पर्धा तर सायं. 7 वा. ‘स्मार्ट मम्मी अ‍ॅड चाईल्ड’ स्पर्धा होणार आहे.15 मे रोजी सायं.7 ते 10 वा.या कालावधीत विविध स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे.