Sun, Jan 20, 2019 06:10होमपेज › Konkan › आंदोलनाची ‘धग’ मुंबईसह दिल्लीत

आंदोलनाची ‘धग’ मुंबईसह दिल्लीत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी दोडामार्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा मिळत असतानाच, आता या आंदोलनाची ‘धग’ मुंबईसह दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. खा. विनायक राऊत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली व या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधून पूर्वीप्रमाणे गोवा सरकारने सिंधुदुर्गातील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवावी यासाठी आपल्या स्तरावरून लक्ष द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत खा. राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत या प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. 

आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर

गेल्या आठ दिवसांपासून दोडामार्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाची व्याप्ती  जिल्हाभर पसरली.  बुधवारी कुडाळ तहसील कार्यालयासमोर  सर्व पक्षीयांनी एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दिला व प्रसंगी  गोव्याला जाणारी सर्व वाहतूक रोखण्याचा इशारा दिला. या गंभीर प्रश्‍नाची  दखल खा. विनायक राऊत यांनी घेत गोव्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेवून लक्ष वेधले व केंद्रीय  आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेत संपूर्ण परिस्थिती कथन केली.  ज्या दोेडामार्ग तालुक्यात  आंदोलन सुरू आहे त्या दोडामार्गचे गोवा  राज्याशी अगदी जवळचे संबंध  आहेत. दररोज लोकांची मोठ्या प्रमाणात  ये-जा  असते.

सिंधुदुर्गातून गोवा मेडिकल  कॉलेजमध्येच ग्णांना उपचारासाठी पाठविले जाते मात्र अलिकडेच गोवा सरकारने इतर राज्यातील रूग्णांना  उपचाराकरीता फी आकारणी  सुरू केली, सिंधुदुर्गातील गरीब रूग्णांना  ती फी  भरणे शक्य नाही. सद्यस्थितीत माकड तापाचे रूग्ण  गोवा मेडीकल कॉलेजमध्ये  उपचार घेत आहेत. तरी आपण या प्रश्‍नी तातडीने  लक्ष घालावा,अशी मागणी खा. राऊत यांनी मंत्री नड्डा यांच्याकडे केली आहे. 

 

Tags : Kudal, Kudal news, Dodamarg, Health Demand, Vinayak Raut,


  •