होमपेज › Konkan › भाडेकरूच्या मदतीने सुनेने केली सासर्‍याची फसवणूक

भाडेकरूच्या मदतीने सुनेने केली सासर्‍याची फसवणूक

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 8:53PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सुनेने भाडेकरुच्या मदतीने सासर्‍याची सुमारे 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना 21 डिसेंबर 2017 ते 26 जून 2018 या कालावधीत घडली आहे.

विशाखा विकास खेडस्कर (रा.खेडशी नाका, रत्नागिरी) आणि चेतन जयवंत बाणे (मूळ रा. राजापूर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात शांताराम नारायण खेडस्कर (रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, शांताराम यांनी त्यांची सून विशाखा हिच्याकडे आपल्याकडील सुमारे 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने विश्‍वासाने ठेवण्यासाठी दिले होते.

विशाखा हिने त्यांचा भाडेकरु चेतन बाणे याच्यासोबत संगनमताने ते दागिने एका बँकेत गहाण ठेवले. तसेच त्याजागी खोटे दागिने बनवून ते कपाटात ठेवून सासरे शांताराम खेडस्कर यांची फसवणूक केली. याबाबत ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.