Thu, Apr 25, 2019 21:36होमपेज › Konkan › ‘प्रादेशिक पर्यटन’साठी साडेचार कोटी

‘प्रादेशिक पर्यटन’साठी साडेचार कोटी

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 12:57AMरत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

कोकणातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा  उभारण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत साडेचार कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत पर्टनस्थळी रस्ते, स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था, सुरक्षारक्षक आणि स्वच्छतागृह आदी सुविधांसाठी 73 लाख 52 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

या योजनेत रत्नागिरी जिल्ह्यासह पालघर, रायगड, ठाणे आदी जिल्ह्यांतील पर्यटनस्थळी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रादेशिक पर्यटन योजनेत पायाभूत सुविधेंतर्गत सभागृह, संरक्षक भिंत, परिसरातील स्वच्छता, स्वागत कमान, अंतर्गत रस्ते, आसनव्यवस्था, सुशोेभिकरण आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पर्यटनस्थळावर सुरक्षारक्षक, मार्गदर्शक, वाहनतळ, पर्यटक निवास,  आरक्षणाच्या सुविधा, भक्त निवास, महिला आणि पुरुष प्रसाधन गृह, विद्युतीकरण, लँडस्केपिंग, उद्यान, वृक्ष लागवड आदी सुधारणा आणि विकासकामे करण्यात येणार आहेत. 
     
ग्रामीण भागाला प्राधान्य
यामध्ये प्राधान्याने ग्रामीण भागात असलेल्या पर्यटन स्थळावर विविध सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेत एकूण 36 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी चार कोटी 32 लाख 88 हजारांचा  निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात 10, रायगडमध्ये17, पालघर जिल्ह्यात दोन आणि ठाणे जिल्ह्यातील 7 कामांचा समावेश आहे. या कामाकरिता 73 लाखाचा प्राथमिक निधी देण्यात आला आहे. उर्वरित निधीही तातडीने देण्याच्या सूचना नुकत्याच कोकण आयुक्तांनी  रत्नागिरी दौर्‍यादरम्यान दिल्या आहेत. 

Tags : ratnagiri district, regional tourism