Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Konkan › ‘कोरे’ मार्गावर चार विशेष सुपरफास्ट गाड्या

‘कोरे’ मार्गावर चार विशेष सुपरफास्ट गाड्या

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:18PMरत्नागिरी : प्रतिनिधी

होळीनिमित्त कोकणात जाणार्‍यांची संख्या पाहता यावर्षी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर जादा सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळी दरम्यान 4 विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

ही गाडी (क्रमांक 02035) स्पेशल गाडी 28 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री 8.50 ला सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.40 ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक 02036 ही विशेष गाडी 1 मार्च रोजी सकाळी 7.25 ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता एलटीटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.

 विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाड्यांना 3 थ्री टायर एसी, 6 स्लीपर क्लास आणि 4 सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत. 

गाडी क्रमांक 02037 विशेष गाडी 1 मार्च रोजी रात्री 8.50 ला एलटीटीहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.40 ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक 02038 ही गाडी 2 मार्चला सकाळी 7.25 ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता एलटीटी स्थानकात पोहोचेल. 

या विशेष गाड्यांना 3 थ्री टायर एसी, 12 स्लीपर क्लास आणि 8 सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 02035 आणि गाडी क्रमांक 02037 या विशेष गाड्यांचे तिकिट बुकिंग 26 फेब्रुवारी रोजी रेल्वेचे अधिकृत तिकिट काउंटर तसेच  ुुु.ळीलींल.ले.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सेकंड क्लास डब्यासाठी तिकिटाचे बुकिंग करणे अनिवार्य नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.