Fri, Jan 24, 2020 22:24होमपेज › Konkan › गणपतीपुळे येथे तिहेरी अपघातात चार जखमी

गणपतीपुळे येथे तिहेरी अपघातात चार जखमी

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 20 2019 10:21PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुंबईकरांच्या इर्टिगा कारला डम्परने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले. जखमींमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. या  घटनेतील डम्परने नंतर नॅनोला धडक दिल्याने नुकसान झाले. ही घटना शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अपघातामध्ये मुंबईतील परळ भोईवाडा येथील पूजा किशोर आंबेरकर (वय 57), वैष्णवी किशोर आंबेरकर (18), स्नेहल बिनू रामचंद्रन (32), अथर्व बिनू रामचंद्रन (4) हे जखमी झाले. त्यांच्यावर मालगुंड येथे
 प्रथमोपचार करुन त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आंबेरकर व रामचंद्रन कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनाला आले होते. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डंपरने त्यांच्या इर्टीगा गाडीला धडक दिली. अपघातात गाडीतील चौघांना दुखापत झाली. या अपघातात ईर्टीगासह नॅनो कारचेही मोठे नुकसान झाले आहे.