Thu, Jul 18, 2019 04:37होमपेज › Konkan › कोकणात प्रक्रिया उद्योगांसाठी परदेशी गुंतवणूक : सुरेश प्रभू

कोकणात प्रक्रिया उद्योगांसाठी परदेशी गुंतवणूक : सुरेश प्रभू

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 10:11PMरायगड : विशेष प्रतिनीधी

कोकणातील काजू, कोकम या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी परदेशी गुंतवणूक आणली जाईल आणि यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणे याबरोबरच शास्त्रशुद्ध आणि यांत्रिक पद्धतीने उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम हाती घेतली जाईल. वाणिज्य आणि कृषी विभाग यासाठी संयुक्त काम करेल, अशी ग्वाही केंद्रीय, वाणिज्य आणि उद्योग खात्याचे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ज्या उत्पादनांना जागतिक मानांकन मिळाले आहे, अशा उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एका मोठ्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट स्थानिक  कारागीर आणि उत्पादकांना प्रोत्साहन देणे आहे, असे आहे. वाणिज्य आणि उद्योग ही खाती यासाठी काम करतील, असेही  सुरेश प्रभू म्हणाले. राष्ट्रीय उत्पादन चर्चा सत्र -2018 या मुद्यावरील व्याख्यानात ते बोलत होते. भारतातातील नैसर्गिक  साधन संपत्तीवर आधारित व्यवसाय निर्माण करण्यावर सरकार भर देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

गावागावात शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षमपणे उभे रहावेत, गाव आर्थिकदृष्टया संपन्न होऊन प्रत्येक घर सुखी व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भौगोलिक मानांकन म्हणजे थोडक्यात अशा नावावरून गुणवत्तेचे दिले गेलेले प्रमाणपत्र यामुळे तुमचा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचू शकतो. यासाठी निश्‍चित प्रयत्न होतील यासाठी जिल्हा पातळीवर व्यवसायाची (रॅकिंग) सोपी करण्यासाठी सचूना दिल्या जातील. तसेच जर असे उद्योग प्रोत्साहित केले तर भारताचा जीडीपी तीन टक्के वाढेल, असा विश्‍वासही प्रभू यांनी यावेळी व्यक्त केला. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड  या जिल्हयांमध्ये  कोकम,काजू या उत्पादनांना यापूर्वी भौगोलिक मानांकन मिळालेलेआहे.त्यांना याचा फायदा नक्कीच मिळणार आहे. परदेशी बाजारपेठेत कोकणातील उत्पादने नक्कीच उच्च पातळी गाठतील यात शंकाच नाही. वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेशजी प्रभूयांच्या यांच्या या प्रयत्यामुळे कोकणातील काजूला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगत  लवकरच उत्पादनांवर जीआय टॅग, गुंतवणुकीसाठी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भौगालिक उत्पन्नावर आधारित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली आहे, आम्ही बनारसी साडीसारख्या एखाद्या विशिष्ट जागेसह ओळखल्या जाणार्‍या उत्पादनांसाठी भौगोलिक संकेत (जीआय) देण्याची मोहीम सुरू केली आहे. एकदा आम्ही अशी उत्पादनेओळखल्यास स्थानिक कारागिरांना महत्त्व प्राप्त होईल. आम्ही मोठ्या मोहिमेची सुरुवात करीत आहोत आणि राज्य सरकार णजल्ांमध्येहेकाम करिार आहेत,  त्यांनी असेही सांगितले की केंद्र सरकार परदेशी गुंतविणूकसंदर्भात वॉर रूम उभारण्याची आणि गुंतवणूकदारांच्या समस्या जाणून घेण्याची योजना आखत आहे.