Thu, Mar 21, 2019 15:43होमपेज › Konkan › चिपळूणमधील पाच शाळांना शासनाच्या निर्णयाचा फटका

चिपळूणमधील पाच शाळांना शासनाच्या निर्णयाचा फटका

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:31PM

बुकमार्क करा

चिपळूण : वार्ताहर

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा राज्य शासनाने घाट घातला आहे. त्यामुळे चिपळूणमधील पाच शाळा बाधित होणार आहेत. यातील तीन शाळांचे स्थलांतर तर दोन शाळा बंद होणार आहेत.

शिक्षण विभागाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाडी -वस्तीवरील शाळा बंद होत आहेत. मुळात कोकणात विरळ वस्ती असल्याने काही तालुक्यात शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. दिवसेंदिवस मराठी शाळेतील मुलांची संख्या रोडावत चालली आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत, पण  ‘शाळा बंद’चा निर्णय तत्काळ घेण्यात आला आहे.

या शैक्षणिक वर्षात तालुक्यात 362 शाळा होत्या. त्यातील दोन शाळांमध्ये विद्यार्थीच दाखल न झाल्याने बंद पडल्या असून यामध्ये कालुस्ते उर्दू आणि तळवडे धनगरवाडी या शाळांचा समावेश आहे.