Wed, Nov 21, 2018 21:25होमपेज › Konkan › मालवण समुद्रात मच्छीमारांचा हल्लाबोल

मालवण समुद्रात मच्छीमारांचा हल्लाबोल

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:58PMमालवण : प्रतिनिधी 

प्रकाशझोतातील मच्छीमारी (एलईडी फिशिंग) रोखण्यात मत्स्य व्यवसाय विभाग अपयशी ठरल्याने संतप्त स्थानिक मच्छीमारांनी सोमवारी मध्यरात्री भर समुद्रात जात 17 वाव क्षेत्रात मच्छीमारी करणार्‍या गोवा-बेतुल येथील दोन एलईडी फिशिंग ट्रॉलर्स व एका पर्ससीन नेट ट्रॉलर्स खलाशा सह पकडू मालवण बंदरात आणले. मच्छीमारांनी अचानक केलेल्या हल्लाबोल केल्यामुळे किनारपट्टी भागात एलईडी मच्छीमारी विरोधातील संघर्ष भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दरम्यान, आ. वैभव नाईक, महाराष्ट्र स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक मच्छीमारांची कैफियत जाणून घेतली.

गेले दोन-तीन दिवस तर परराज्यातील एल.ई.डी.द्वारे मच्छीमारी करणार्‍या बोटींनी मालवण समुद्रात धुमाकूळ घातला आहे. सोमवारी  मध्यरात्री बेकायदेशीरपणे किल्ले सिंधुदुर्गच्या मागील भागात  17 वाव मध्ये एलईडी मच्छीमारी करणार्‍या बोटी स्थानिक मच्छीमाराना दिसून आल्या.  मध्यरात्री 1 वा. च्या सुमारास प्रखर प्रकाशझोत टाकून मच्छीमारी करण्यात येत असलेल्या बोटी पाहून स्थानिक मच्छीमारांचा संताप अनावर झाला.