Wed, Feb 20, 2019 22:58होमपेज › Konkan › पडवणे येथून वाशी मार्केटला पहिली आंबा पेटी रवाना

पडवणे येथून वाशी मार्केटला पहिली आंबा पेटी रवाना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी 

देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिरसेकर यांनी वाशी मार्केटला हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान प्राप्त केला आहे.

जुलैमध्ये आलेला आंब्याचा मोहोर आधुनिक पिक तंत्रज्ञानाने टिकवून त्यांनी हे  आंब्याचे उत्पादन घेतले आहे. यामधून या महिन्यातच त्यांना शंभर आंब्याची फळे मिळाली आहेत. या वर्षातील हापूस आंब्याचा विक्रीची सुरुवात  शिरसेकर यांनी पाठवलेल्या पेटीचे पूजन करून वाशी मार्केटमधील दलालांनी केली. जुलै महिन्यात प्रकाश शिरसेकर यांच्या कलमाला मोहोर आला होता. त्यांनी या  मोहोराचे संरक्षण मांडव घालून केले व सर्व फळांना प्लास्टिकच्या पिशव्यांचे आवरण लावले.

यामुळे हे आंबे टिकून त्यांना नोव्हेंबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन मिळाले आहे. अद्याप संपूर्ण देवगड तालुक्यात झाडांवर मोहोरही उगवलेला नसताना देवगड हापूस पेटी वाशी मार्केटमध्ये पोहोचली याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्‍त होत आहे.