Sun, Aug 18, 2019 20:37होमपेज › Konkan › दापोलीत बेकरीला भीषण आग

दापोलीत बेकरीला भीषण आग

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:35AM

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

दापोली मच्छी मार्केट येथे रविवारी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून बेकरी, तसेच केळ्याची वखार खाक झाली. या आगीत सुमारे अकरा लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किमुळे आग लागल्याचा  अंदाज पंचनाम्यामध्ये नमूद केला आहे.

रफिक इब्राहिम बागवान यांच्या केळ्याच्या वखारीचे  45 हजार, तर हातगाडी के्रट आणि स्कूटी गाडी, असे 32,250 रु. इतके नुकसान झाले आहे. मजिद युसुफ घीवाला यांच्या अय्यंगार बेकरीची लोखंडी शेड आणि खाद्यपदार्थ यांचे मिळून 2 लाख 21 हजार, फ्रिज आणि टॉन केस 78 हजार,  लोखंडी पाईप, पत्रे, शेड असे 1 लाख 50 हजार आणि बेकरी फर्निचरचे 5 लाख 25 हजार, तसेच शैलेजा प्रकाश नंदाते यांचे 16 ते 17 हजारांचे नुकसान झाले आहे.