Thu, Jun 27, 2019 12:34होमपेज › Konkan › कुडाळात मेडिकलला आग : दीड लाखांचे नुकसान

कुडाळात मेडिकलला आग : दीड लाखांचे नुकसान

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 9:50PMकुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळ प्रभावळकरवाडा जवळील लक्ष्मीनारायण मेडिकलला अचानक लागलेल्या आगीत सुमारे दीडड लाखांचे नुकसान झाले. ही घटना  सोमवारी सकाळी  घडली.  शॉटसर्किटने आग लागण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. 

पावशी येथील  औषध विक्रेते संजय कोरगांवकर यांचे कुडाळ येथे  मेडीकल आहे. सोमवारी  पहाटेपासून मेडिकलमध्ये आग धुमसत होती मात्र शटर बंद असल्याने ही आग कोणाच्या लक्षात आली नाही.सकाळी 8  वा. च्या सुमारास  श्री. कोरगांवकर हे मेडिकल उघडण्यासाठी आले असता  त्यांच्या ही  आग निदर्शनास आली.त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने इस्ट्रीब्युशनच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न केले. अग्‍निशामक बंबही पाचारण करण्यात  आला.  या आगीत कॉस्मेटीक साहित्य, लाकडी रॅक, इलेक्ट्रॉनिक  वायरिंग, दोन सीसीटीव्ही कॅमेरे आदी जळून सुमारे  दीड लाख रू.चे  नुकसान झाले. कुडाळ पोलिसांना  याबाबत  माहिती मिळताच  पोलिस नाईक  नाथेबा हिपरकर, अमित राऊळ आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर मेडिकलचे मालक नारायण  उर्फ संजय गोविंद कोरगांवकर यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास चंद्रकांत झोरे करीत आहेत. 

Tags : Konkan, Fire, medical, shop