Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Konkan › आगीत तीन घरे खाक

आगीत तीन घरे खाक

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 9:12PM खेड : प्रतिनिधी

तालुक्यातील धामणंद गुढ्याचा आड येथील भोसले कुटुंबीयांच्या घराला शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या दुर्घटनेनंतर पोलिस, प्रशासन व महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची भेट देऊन पंचनामा केला. धामणंद गुढ्याचा आड या भागात रमेश काशिराम भोसले, मंगेश काशिराम भोसले व दीपक काशिराम भोसले यांची एकमेकांना जोडून तीन घरे आहेत.

भोसले कुटुंबीयांच्या घरामध्येच एक दुकानही  आहे. शनिवारी (दि. 17 )  रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास भोसले यांच्या घराला अचानक आग लागली. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की, घरातील सर्व सामान व दुकानातील वस्तू आगीत जळून खाक झाल्या. यात घरातील कपडे, कपाटे, लाकडी वस्तू आणि धान्य जळून भोसले कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.