Mon, May 20, 2019 08:26होमपेज › Konkan › सावंतवाडी मतदारसंघात सेना उपसरपंचांचे अर्धशतक पार करेल

सावंतवाडी मतदारसंघात सेना उपसरपंचांचे अर्धशतक पार करेल

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 7:55PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

विकास कामांचा झपाटा शिवसेनेने लावला असून विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपसरपंचांचे अर्धशतक पार करू,असा विश्‍वास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला.  

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात झालेल्या मासिक बैठकीत ते बोलत होते. महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, शहरप्रमुख शब्बीर मणियार, माजी पं.स.सदस्य अशोक दळवी, युवासेना तालुकाप्रमुख सागर नाणोस्कर,सभापती आनारोजीन लोबो,भारती मोरे,शुभांगी सुकी, दीपाली सावंत, जि.प.सदस्या रोहिणी गावडे, विभागप्रमुख प्रशांत कोरगावकर, नामदेव नाईक, बाळकृष्ण वाळके, आनंद दळवी, गुरुनाथ नाईक, संजय माजगावकर, बाळा वाळके, नामदेव परब, तालुका उपसंघटक महादेव सोनुर्लेकर, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, उपविभागप्रमुख महेश शिरोडकर, विश्‍वास घाग, उत्तम पारधिये, दाजी सावंत आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी माजगाव शाखा संघटकपदी भारती कासार व माजगाव उपशाखासंघटकपदी शाहिस्ता शहा तसेच आंबोली शाखाप्रमुखपदी हेमंत नार्वेकर यांची  निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकार्‍यांचे मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व महिला संघटक रश्मी माळवदे यांनी अभिनंदन केले.

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर 100 टक्के उपसरपंच बसविण्याचे आवाहन करताना पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांनी गावागावात केलेल्या कामांचा प्रचार आत्तापासूनच करा, असे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी  यावेळी केले.

कार्यकर्त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून आपापल्या भागात या योजना पोहचवून सर्वसामान्यांना लाभ मिळावा,या हेतून लवकरच कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हे शिबिर जानेवारीमध्ये घेण्यात येणार आहे. 

लवकरच सावंतवाडी शहर कार्यकारिणीमध्ये फेरबदल करून तरुण कार्यकर्त्यांना वाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शहरप्रमुख शब्बीर मणियारच असतील परंतु उपशहरप्रमुख, महिला शहरसंघटक आदी पदांवर नियुक्त्या करून शहरावर विशेष लक्ष देण्याचा निर्णय झाला. यावेळी विकासकामे होत नसल्याबद्दल विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.