Tue, Sep 25, 2018 10:37



होमपेज › Konkan › कोकण किनारपट्टीवर वेगवान वार्‍यामुळे मच्छीमारांना इशारा

कोकण किनारपट्टीवर वेगवान वार्‍यामुळे मच्छीमारांना इशारा

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 10:49PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीवर गेले दोन दिवस वेगवान वार्‍याने सागरी भागात जोरदार लाटा उसळण्याच्या हवामान विभागाच्या  शक्यतेमुळे मच्छीमारांसह किनारपट्टी भागातील वसाहतींना  सावधगिरीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी नजीकच्या बंदरांचा आधार घ्यावा किंवा समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

आंबा हंगाम सरू झाल्यापासून कोकणातील  वातावरणात वारंवार बदल होत आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसू लागले आहेत. मध्यंतरी अवकाळी पावसाचा फटकाही कोकणाला बसला. आता जोरदार वार्‍याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पूर्वीच्या ओखी वादळामुळे कोकण किनारपट्टीला तडाखा दिला होता.  दरम्यान, शुक्रवारी मात्र दिवसभर हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागमूस देखील नव्हता. 

 

Tags : Konkan, konkan news,  faster wind, coast, fishermen,