Mon, Jan 27, 2020 11:37होमपेज › Konkan › मोबाईल रेंजसाठी ओटवणे ग्रामस्थांचे उपोषण

मोबाईल रेंजसाठी ओटवणे ग्रामस्थांचे उपोषण

Published On: Jan 30 2019 1:33AM | Last Updated: Jan 30 2019 1:33AM
ओटवणे : वार्ताहर

ओटवणे येथे बीएसएनएल रेंजसाठी संतोष भैरवकर यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले उपोषण अखेर मंगळवारी सायंकाळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या आश्‍वासनानंतर थांबवण्यात आले. उपोषणकर्त्यांना माजी सरपंच रवींद्र मापसेकर, गाव प्रमुख रवींद्र गावकर संतोष कासकर, संतोष तावडे आदींपी लिंबू सरबत देऊन उपोषण उठवले.

ओटवणे येथे मंगळवार सकाळपासूनच संतोष भैरवकर, सिताराम जाधव, संतोष कासकर आदींसह ओटवणे ग्रामस्थ सकाळपासूनच उपोषणाला बसले होते. दुपारी काही व्यक्‍तींनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. मात्र त्यांच्याजवळ उपोषणकर्त्यांना उठवण्यासाठी ठोस उपाय मिळाला नाही.सायंकाळी  4 वा. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी संतोष भैरवकर यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला व उपोषण थांबवण्याची विनंती केली. तुमच्या मागण्यांबाबत आपण मंगळवारी बीएसएनएलचे अधिकारी व ग्रामस्थांची तहसीलदार कार्यालयात बैठक लावू असे  आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर उपोषण थांबवण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांनी  बीएसएनएल चे सर्व अधिकारी व ठेकेदार खा. विनायक राऊत यांचा निषेध व्यक्‍त केला.

माजी सरपंच संतोष कासकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, संतोष तावडे, दिनेश गावकर, नारायण गावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाब्या म्हापसेकर, स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर, सगुण गावकर, बाबा मळेकर, गजानन रासम,ऊर्फ म्हापसेकर, आनंद गावकर, गणेश गावकर, उमा जाधव, संदीप जाधव आदी या उपोषणात सहभागी झाले होते.