Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Konkan › आरेवारेतील समुद्रात बापलेक बुडाले; एकाचा मृत्यू

आरेवारेतील समुद्रात बापलेक बुडाले; एकाचा मृत्यू

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:29PMरत्नागिरी: प्रतिनिधी

रत्नागिरी शहरानजीकच्या आरेवारे समुद्रात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बापलेक बुडाले. त्यांना स्थानिकांनी बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते; परंतु मुबाज शिरगावकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. 

मुबाज इस्माईल शिरगावकर (वय 36) आणि अनाज मुबाज शिरगावकर (9, दोघेही रा. कोतवडे) असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत. त्यापैकी अनाज वर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तर मुबाज शिरगावकर यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते.  

शिरगावकर कुटुंब शुक्रवारी सायंकाळी आरेवारे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी मुबाज शिरगावकर आणि अनाज शिरगावकर हे दोघे समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना दोघेही आत ओढले गेले. समुद्रातील मोठ्या लाटेसोबत दोघेही बुडू लागले. ते पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. तो ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी आणि पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मुबाज आणि अनाज यांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मुबाज यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. याची माहिती मिळताच शिरगावकर यांच्या नातेवाईकांसह कोतवडे ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.