Wed, Jun 26, 2019 11:28होमपेज › Konkan › शेतकर्‍यांना २२१ कोटींचे कर्ज वाटणार

शेतकर्‍यांना २२१ कोटींचे कर्ज वाटणार

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:56PMप्रतिनिधी : रत्नागिरी

खरीपाचा हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कर्ज वाटपासाठी शासकीय यंत्रणा आणि बँकांनी तयारी केली आहे. या वर्षी विक्रमी म्हणजे 221 कोटी 65 लाख रुपये इतक्या रकमेचे वाटप रत्नागिरी जिह्यातील शेतकर्‍यांना करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आल्याची माहिती कृषी खात्यातील सुत्रांनी दिली.

या वर्षीच्या खरीपाच्या हंगामात वाढीव कृषी कर्ज वाटपाची तयारी सुरु करण्यात आली आहे. वेगवेगळ्या बँकांना त्यासाठी या पूर्वी सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे बँकांनी कर्ज वाटपाचे तपशीलवार नियोजन केले आहे. या वर्षी 121 कोटी 65 लाख रुपये एवढ्या रकमेचे शेतकर्‍यांना वाटप करण्यात येणार आहे. गतवर्षी 67 हजार 771 शेतकर्‍यांना 167 कोटी 64 लाखांचे वाटप करण्यात आले होते. मागच्यावर्षी 172 कोटी 84 लाख रुपये वाटप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. उद्दीष्टाइतके वाटप होऊ शकले नाही. रत्नागिरी जिह्यातील शेतकरी गरज लक्षात घेऊन कर्ज मागणी करत असतात. शेतकर्‍यांना कर्ज घेण्यासाठी आग्रह करावा लागतो. अनेक शेतकरी आपल्या बियाण्याच्या आणि खताच्या गरजा आपापसात भागवत असतात.

यंदासाठी झाले 5 कोटीचे वाटप

काही शेतकर्‍यांनी शेती कामांना सुरुवात केली आहे. त्यासाठी बँकांच्या विविध शाखातून 4 कोटी 97 लाख रुपये एवढ्या रकमेचे कृषी कर्ज उचलण्यात आले आहे. एकूण 6700 शेतकर्‍यांनी कृषी कर्ज घेतले आहे. आणखीही शेतकर्‍यांनी नजीकच्या बँकेशी संपर्क साधून कर्ज प्रकरण निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.