Tue, Sep 25, 2018 05:01होमपेज › Konkan › सिंधुदुर्गमधील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

सिंधुदुर्गमधील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:42PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-रत्नागिरी अशा प्रवासादरम्यान भोके ते उक्षीमध्येे रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

श्रीधर भार्गव शिरवणकर (19, रा. सिंधुदुर्ग) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रेल्वेचे कर्मचारी सतीश शंकर सुर्वे यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार गुरुवार 10 मे रोजी सायंकाळी 7.15 वा. सुमारास सतीश सुर्वे यांना भोके ते उक्षी दरम्यान रूळावर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला होता. त्यांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.