Wed, Nov 21, 2018 11:47होमपेज › Konkan › माजी सैनिकाची गळफासाने आत्महत्या

माजी सैनिकाची गळफासाने आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील जैतापूर, अनंतवाडी येथील माजी सैनिक सुरेंद्र यशवंत परेलकर (75) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी सैनिक असलेले सुरेंद्र परेलकर (75) हे जैतापूर येथील घरात वयोवद्ध पत्नीसह राहत होते. शनिवारी पहाटे 5 वा.  सुमारास नेहमीप्रमाणे उठून त्यांनी चहा घेतला व घरातील पडवीत जाऊन बसले होते. त्यानंतर पत्नी आंघोळीसाठी गेली असता त्यांनी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. परलेकर यांची पत्नी आंघोळ आटोपून बाहेर आली असता त्यांच्या ही घटना निदर्शनास आली.

याबाबत नाटे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परलेकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून म्हणून नोंद केली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.