'निसर्ग'च्या दणक्याने जहाजच आले किनाऱ्यावर!

Last Updated: Jun 03 2020 12:43PM
Responsive image


रत्नागिरी : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे कोकण, मुंबई, रायगड भागात जोरदार वारा सुरु झाला आहे. तसेच समुद्रही खवळला आहे. त्यामुळे प्रशासनाने नाविकांना आपल्या नौका समुद्रात घेऊन न जाण्याचा सल्ला दिला आहे. पण, एक व्यावसायिक जहाज समुद्रात अडकले होते. ते जहाज बाहेर काढणे अशक्य दिसत असतानाच 'निसर्ग' चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या मोठ्या लाटांमुळे हे जहाज नशिबाने किनाऱ्याला लागले.