होमपेज › Konkan › भरपाई प्रश्‍नी आ. खलिफे आक्रमक

भरपाई प्रश्‍नी आ. खलिफे आक्रमक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

आंबा व काजू पीक नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळण्याबाबत आ. हुस्नबानू खलिफे यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला. नुकसान होऊनही अद्याप पंचनामे सुरु नाहीत, सरकार कोकणाबाबत गंभीर नाही, अन्य विभागांप्रमाणे कोकणाकडे लक्ष दिले जात नाही, असे मुद्दे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत आठ दिवसांत आंबा-काजू नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

कोकणात अवेळी पडलेल्या पावसाने आंबा व काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात या मुद्द्यावर आमदार खलिफे यांनी आवाज उठविल्यानंतर महसूलमंत्री पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देत असल्याचे जाहीर केले. मात्र, पंचनामे सुरू झालेच नसल्याचा मुद्दा आ. खलिफेंनी उपस्थित करीत कोकणातील शेतकरी संकटात असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही सरकार गंभीर नाही, कोकणावरच हा अन्याय का? कोकणाकडे दुर्लक्ष का? असा खडा सवाल खलिफे यांनी उपस्थित केला. कोकणातील बागायतदारांना हेक्टरी मोबदला न देता झाडाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आ. खलिफे यांना आ.विद्या चव्हाण यांनी साथ देत कोकणातील शेतकर्‍याला आंबा-काजू नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली. यावर महसूलमंत्री पाटील यांनी यापूर्वी ओखी वादळाने झालेली नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आंबा व काजू नुकसानाबाबतही येत्या आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले.

Tags : Konkan, Konkan News, loss, Panchnama, operational, yet


  •