Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Konkan › रत्नागिरीत २५ जानेवारी रोजी पर्यावरण बालनाट्य महोत्सव

रत्नागिरीत २५ जानेवारी रोजी पर्यावरण बालनाट्य महोत्सव

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 9:37PM

बुकमार्क करा

रत्नागिरी ः प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको-फोक्स व्हेंचर्स आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नाट्य महोत्सव 25 जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यस्तरीय माध्यमिक आंतरशालेय पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता 5 वी ते 10 वीतील शालेय बालकलाकार यांनी सहभाग घ्यायचा आहे. सादरीकरणाची वेळ कमीत कमी 10 मिनिटे व जास्तीत  जास्त 12 मिनिटे असणार आहे. एका संघात कमीतकमी 2 आणि जास्तीत जास्त 20 विद्यार्थी संख्येची मर्यादा आहे. 

उत्कृष्ट बालनाट्य प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय 10 हजार आणि तृतीय 7 हजार, उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम 3 हजार, द्वितीय 2 हजार, तृतीय 1 हजार, उत्कृष्ट लेखन प्रथम 3 हजार, द्वितीय 2 हजार, तृतीय 1 हजार उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम 1 हजार, द्वितीय 750 आणि तृतीय 500 अशी परितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी नंदू जुवेकर आणि प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.