Thu, Aug 22, 2019 08:47होमपेज › Konkan › ‘युवा रोजगार संवाद’च्या माध्यमातून दोन हजार तरुणांना रोजगाराची संधी 

‘युवा रोजगार संवाद’च्या माध्यमातून दोन हजार तरुणांना रोजगाराची संधी 

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:33PMसावंतवाडी : प्रतिनिधी

भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आ. प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी भाजप कार्यालयात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. 

भाजप कोकण संघटनमंत्री सतीश धोंड, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने आदी उपस्थित होते.भाजप युवा मोर्चा सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष तथा युवा रोजगार संवाद यात्रेचे जिल्हा संयोजक निशांत तोरसकर यांनी आ.प्रसाद लाड यांची भेट घेऊन युवा रोजगार संवाद यात्रेच्या अनुषंगाने संकलित झालेली दोन हजार बेरोजगार युवक-युवतींची पहिली यादी त्यांच्याकडे सुपूर्द केली. सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांमध्ये या बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करुन देण्याची तसेच ही यादी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. यावर प्रसाद लाड यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. 

तसेच स्वतःच्या कंपनीमध्ये कोकणातील दोन हजार युवक युवतींना रोजगार देण्याचे कबूल केले आणि लवकरच नरेंद्र पाटील अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ  उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शाळेचे आयोजन करण्याचे आश्‍वासन दिले.