होमपेज › Konkan › शाळांमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह

शाळांमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 25 2018 11:58PMरत्नागिरी : प्रतिनिधी

दैनंदिन जीवनात आवश्यक विद्युत सुरक्षेकरिता जे.एस.डब्ल्यू. जयगड पोर्टतर्फे परिसरातील शाळांमध्ये विविध माध्यमांच्या आधारे जनजागृती करण्यात आली. युनिट हेड कॅप्टन श्रीराम चंदर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.11 ते 17 जानेवारी या कालावधीत जे.एस.डब्ल्यू. जयगड पोर्टतर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. 

यावेळी विद्युत विभागप्रमुख महेश आर आणि दिनेश सिंग यांच्या नियोजनानुसार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी यावेळी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. तसेच उपस्थितांना सी.डी.द्वारे माहिती देण्यात आली. यावेळी प्रश्‍नोत्तरांच्या वेळी अचूक निरीक्षण व उत्तर देणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

कोणीही विद्युत तारेजवळ खेळू नये, विद्युत उपकरणे जपून हाताळावीत, विद्युत सुरक्षेकरिता प्रत्येकाने काळजी घ्यावी, विद्युत साहित्य खरेदी करताना आय.एस.आय. प्रमाणितच साहित्य घ्यावे, तसेच विद्युत जोडणी करताना परवानाधारक व्यक्‍तीकडूनच काम करून घ्यावे, असे आवाहन केले.  यावेळी सी.एस.आर.प्रमुख सुधीर तैलंग, उमेश नाईक, संतोष म्हात्रे, लाखण, योगीता महाकाळ, सनोबर सांगरे आदी उपस्थित 
होते.