Mon, Sep 24, 2018 20:51होमपेज › Konkan › विद्युतभारित तार अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू

विद्युतभारित तार अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 11:08PMचिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील कापरे येथे शेतीचे काम करीत असताना अंगावर विद्युतभारित तार पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. अनंत रत्नू कदम (वय 62, रा. कापरे मधलीवाडी) असे त्यांचे नाव आहे. 

याबाबत दगडू राजाराम कदम यांनी चिपळूण पोलिसांना खबर दिली.  अनंत कदम हे सोमवारी (दि. 11) सकाळी 8 च्या सुमारास कापरे येथील झाडेरान भागात शेतीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युतभारित तार पडली. यावेळी विजेचा  जोरदार धक्‍का बसल्याने अनंत कदम यांचा जागीच मृत्यू झाला.‘महावितरण’च्या गलथान कारभारामुळे एका शेतकर्‍याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे ‘महावितरण’ विरोधात परिसरातून नाराजी व्यक्‍त होत आहे.

दरम्यान, या घटनेनंंतर सायंकाळी उशिरा ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त कदम कुटुंबीयांना 20 हजारांची तातडीची मदत केली.