Mon, Jun 17, 2019 05:02होमपेज › Konkan › तेराशे जलतरणपटूंचा सहभाग

तेराशे जलतरणपटूंचा सहभाग

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 10:45PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

मालवण-चिवला बीचच्या अथांग समुद्रात राज्यभरातील सुमारे 1300 जलतरणपटू झेपावले.  आठव्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याचा मयांक चाफेकर व कोल्हापूरची निकिता प्रभू हे पाच किलोमीटर गटात विजेते ठरले.दोघांनीही स्पर्धेतील वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला.  राष्ट्रपतीपदक विजेती महाराष्ट्राची सागरकन्या रूपाली रेपाळे यांची उपस्थिती स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले. 

मयांक चाफेकरची ‘हॅटट्रिक’..

मयांक चाफेकर यांने सलग तीनवेळा वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित आठव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे उदघाटन समुद्रात श्रीफळ अर्पण करत व  स्पर्धकांना फ्लॅग दाखवून रविवारी सकाळी करण्यात आले. 

प्रादेशिक बंदर अधिकारी अजित टोपणो, न. प. मुख्याधिकारी रंजना गगे, भाजप पदाधिकारी अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष विजू केनवडेकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते. सूत्रसंचालन पलाश चव्हाण व दीपाली वायंगणकर यांनी केले.

स्पर्धेतील वेगवान जलतरणपटू

5 किलोमीटरमध्ये - मयांक चाफेकर (ठाणे), निकिता प्रभू (कोल्हापूर), 3  किलोमीटर - मंदार देसुरकर (बेळगाव), हिमाली फडके (नागपूर), 2 किलोमीटर - आदेश रुकडीकर (कोल्हापूर), अनुष्का पाटील (कोल्हापूर), 1 किलोमीटर - (रायगड), सवर आकुजकर (ठाणे), 500 मीटर स्पेशल - आदित्य घाग (ठाणे), मिनेरा पाटील (पुणे) या जलतरणपटूनी वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावला.