Wed, Nov 21, 2018 22:32होमपेज › Konkan › शिक्षण हे समृध्दीचे साधन : खा.राऊत

शिक्षण हे समृध्दीचे साधन : खा.राऊत

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:30PMकणकवली : प्रतिनिधी

शिक्षण हे समृध्दीचे व प्रगतीचे साधन आहे.  या शिक्षणातूनच माणसाचा सर्वांगिण विकास होत असतो.शिरवल शाळा नं. 1 या शाळेनेसुध्दा गेल्या शंभर वर्षात अनेक विद्यार्थी घडविले. जे आज कुटुंबाच्या उत्कर्षाबरोबरच गावाच्या विकासात देखील हातभार लावत आहेत. सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने येऊन आयोजित केलेला हा शाळेचा शतक महोत्सवी उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन खा. विनायक राऊत यांनी केले.

 शिरवल शाळा नं 1 चा शतक महोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन खा.विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी शतक महोत्सवी स्मरणीकेचे प्रकाशनही त्यांनी केले. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमासाठी मुंबईहुन आजी-माजी पदाधिकारी, माजी ग्रामस्थ आले होते. या शतक महोत्सवी समितीच्यावतीने शाळेच्या माजी शिक्षकांचा   सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शिक्षकांनी शाळेच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. 

यावेळी या शाळेतून घडलेल्या अनेक उच्च पदस्थ माजी विद्यार्थ्यांचा शतक महोत्सव समितीच्यावतीने सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रभाकर करंबेळकर, अनिल सावंत, पोलिस निरीक्षक लक्ष्मण तांबे, पोलिस रायटर दिलीप शिरसाट, पुंडलिक कुडतरकर, अ‍ॅड, अनिल सावंत, पांडुरंग कुडतरकर, रांगोळी स्पर्धेत मुंबई युनिर्व्हसीटीतर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रविकिरण शिरवलकर, शिरवल हितवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुभाष सावंत, शाळेसाठी जमिन विनामुल्य दिलेले विठ्ठल दत्तात्रय राणे उर्फ आना राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, सिनेनाट्य अभिनेते महेश सावंत, भास्कर सोहनी, डॉ. वसंत करंबेळकर, दत्ताराम तांबे, शांताराम  तांबे, प्रशांत कुडतरकर, प्रवीण कोरगावकर, तुळशीदास कुडतरकर, ‘गाव गाता गजाली’ मालिकेतील अभिनेते शंकर सावंत यांच्यासह अनेक क्षेत्रात चमकदार कामगिरी करुन शाळेचे आणि गावचे नाव उज्वल करणार्‍या माजी विद्यार्थ्यांचा तसेच शिरवल शिक्षण हितवर्धक मंडळाच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. 

Tags : Konkan, Education, means,  enrichment