Mon, Nov 19, 2018 04:26होमपेज › Konkan › शिक्षण मंत्री तावडे आज रत्नागिरीत

शिक्षण मंत्री तावडे आज रत्नागिरीत

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:06PM

बुकमार्क करा
 

रत्नागिरी : प्रतिनिधी

दि. 11 ते 13 जानेवारीदरम्यान  शासनस्तरावर होणार्‍या ‘शिक्षण वारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे जात असताना प्राथमिक, माध्यमिक, डाएट परिवार ‘शिक्षण वारी’ यशस्वी होण्यासाठी एम. डी. नाईक हॉल येथे एकवटला आहे. या वारीचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी सकाळी 10 वाजता भाजप कार्यालयात ना. तावडे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षणाची वारी उद्घाटन कार्यक्रमाला शिक्षण सचिव नंदकुमार, संचालक विद्या प्राधिकरण पुणे, सुनील मगर, गंगाधर म्हमाणे, सुनील चौहान, दिनकर पाटील, डी. एस. जगताप, एस. डी. माने, विशेष कार्यकारी अधिकारी श्रीमती प्राची साठे उपस्थित राहणार आहेत.