Fri, Mar 22, 2019 01:39
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › युरेकाच्या मुलांनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या

युरेकाच्या मुलांनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 10:13PMकणकवली : वार्ताहर

युरेका सायन्स क्‍लबच्या मुलांनी बीया व विघटनशील टाकाऊ पदार्थांपासून आकर्षक राख्या व भेटवस्तू तयार केल्या आहेत. त्याचे प्रदर्शन व विक्री कणकवलीत शुक्रवार 17 ऑगस्ट रोजी होणार्‍या गावठी आठवडा बाजारात होणार आहे. युरेका सायन्स क्‍लबमार्फत सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमधून मुलांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात. रक्षाबंधनानिमित्त युरेका सायन्स क्‍लबच्या मुलांनी असाच आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.

या मुलांनी फळांच्या बीया व विघटनशील टाकाऊ पदार्थांपासून राख्यांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर भावाने बहिणीला देण्यासाठीच्या भेटवस्तूही या मुलांनी तयार केल्या आहेत. या राख्या व वस्तूंचे प्रदर्शन कणकवली पं. स. च्या गावठी आठवडा बाजारात दु. 3.30 ते 6 या वेळेत होणार आहे. नागरीकांनी भेट देत मुलांच्या कल्पकतेला दाद द्यावी, असे आवाहन सुषमा केणी व युरेका सभासद यांच्यावतीने  करण्यात आले आहे.