Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Konkan › बाप्पाच्या आराससाठी इको फ्रेंडली मखर 

बाप्पाच्या आराससाठी इको फ्रेंडली मखर 

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 8:08PMकणकवली : अनिकेत उचले

प्लास्टिक बरोबरच थर्माकॉलवर सरकारने बंदी घातली आहे. यामुळे यंदा गणेश उत्सवात थर्माकोलचे मखर गायब झाले आहेत. पण याला पर्याय म्हणून मकर तयार करणार्‍या काही कलाकारांनी ‘इको-फ्रेंडली’ मखर विक्रीस आणले आहेत.  या मखरांना गणेश भक्‍तांचीही चांगली पसंती मिळत आहे.

गणेश मूर्ती विराजमान होणार्‍या जागेच्या सजावटीसाठी अलीकडे सरार्सपणे  प्लास्टिक व थर्माकोलचा वापर केला जात होता. प्लास्टिक व थर्माकोलपासून बनवेल्या सजावटीच्या वस्तू दिसायला आकर्षक वाटत असल्या तरी पर्यावरणाच्यादृष्टीने त्या हानिकारक ठरत होत्या. दरम्यान सरकारने  प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर सरसकट बंदी घातल्याने सहाजिकच या सजावटीच्या  वस्तुंवरही बंदी आली. या मुळे या व्यावसायातील काही कारागीर बेकार झाले. पण काही कारागीरांनी यावर मात करत पर्यावरण पूरक मखर तयार करुन बाजरपेठांमध्ये विक्रीस आणले आहेत. 

हे मखर कागदाच्या लगद्यापासून बनविले असून वजनाने हलके व  दिसायला आकर्षक आहेत. यामध्ये गुलाबाच्या फुलांचे सिहांसन, मोरपीस सिंहासन, कमानी मखर विविध प्रकार आहेत. हे मखर फोल्डिंगचे असल्याने या मखरांचा 3 ते 5 वर्ष सहज वापर होऊ शकतो. हे मखर प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदीसाठी गणेश भक्‍तांची गर्दी  होत आहे. या मखरांच्या किंमती 1 हजार 700 ते 10 हजार पर्यंत आहेत. थर्माकॉलच्या तुलनेत या मखराच्या किंमती जास्त असल्या तरी  गणेशभक्‍तांचा कल याकडे दिसून येत आहे. बाजारपेठामध्ये याला वाढती मागणी असल्याने हे मखर बनविण्याचे काम रात्रंदिवस चालू आहे.

सरकारने थर्माकॉलच्या वस्तूवर बंदी घातली. सहाजीकच आम्हा कारागिरांवर बेकारीची वेळ आली होती. यावर कशाप्रकारे मात करता येईल.यावर विचार- विनिमय केला. त्यावेळी  ईको-फ्रेंडली पर्यावरण पूरक मखर बनवण्याची संकल्पना सुचली. या संकल्पनेतून आम्ही पर्यावरणपूरक असे आकर्षक मखर बनविले. यामध्ये कागदी लगदा, पुठ्ठ्यांचा वापर करण्यात आला आहे. या मखरांना ग्राहकांकडूनही चांगली मागणी आहे.    -रश्मी फोंडेकर, मकरंद राणे  ( मखर उत्पादक)

थर्माकॉल मखरपेक्षा कागदी लगद्यापासून बनवलेले. पर्यावरण पूरक मकर आकर्षक आहेत. जरी हे मखर थर्माकॉल मकराच्या किंमतीपेक्षा जास्त असले.तरी पर्यावरण दृष्टया उपयुक्‍त आहेत.प्लास्टिक व थर्माकॉलवर घातलेली बंदी योग्य असून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करून सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या मोहिमेत आम्ही आमचे योगदान देऊ.  - प्रथमेश चव्हाण, ग्राहक