Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › चिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

चिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 11:10PM

बुकमार्क करा

चिपळूण : प्रतिनिधी

चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे या मागणीसाठी येथील शिवसेना खा. विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. कोकण आणि प. महाराष्ट्राला जोडणार्‍या या  मार्गाचे तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी खा. राऊत यांनी केली आहे.

चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे काम शापुरजी पालोनजी ग्रुपला देण्यात आले होते. या कामाच्या कराराचा मोठा शुभारंभ झाला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना. अनंत गीते आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. परंतु त्या नंतर या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. कोकण किनारपट्टी आणि प. महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे.

या मार्गामुळे रेल्वे बंदरांशी जोडली जाईल. मात्र, अद्याप या बाबत रेल्वेमार्ग कामाच्या कोणत्याच हालचाली नाहीत, अशा स्वरूपाचे पत्र खा. राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे.  रेल्वे मंत्रालयाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. हा मार्ग लवकर पूर्ण झाल्यास मध्य रेल्वे व कोकण रेल्वे जोडली जाईल. माल वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध होईल. शिवाय या मार्गावरून प्रवासी वाहतूकदेखील सुरू होईल. या संदर्भातही खा. राऊत यांनी चर्चा केली.