Sat, Jan 19, 2019 08:29होमपेज › Konkan › ‘ईडू’च्या संचालकाला अटक

‘ईडू’च्या संचालकाला अटक

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 11:24PM

बुकमार्क करा
 

चिपळूण : खास प्रतिनिधी

ईडू अँड अर्न कन्सल्टन्सीचा संचालक रविकिरण बटूला याला अखेर चिपळूण पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिपळुणात कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. सुमारे पन्‍नास ते साठ संगणकांच्या हार्ड डिस्क जप्‍त करण्यात आल्या. यामुळे आता या फसवणुकीचा उलगडा होणार आहे.  ईडूने चिपळूणवासीयांना ‘येडू’ बनवल्यानंतर इम्तियाज मुकादम यांच्या एका तक्रारीने ही फसवणूक उजेडात आली. कोणत्याही प्रकारची नोंदणी नसताना हा व्यवसाय सुरू होता.

बुधवारी रात्री उशिरा गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्‍यांनी शहरातील बहादूरशेखजवळ असलेल्या ईडूच्या कार्यालयावर छापा टाकला. ईडूचे जाळे सर्वत्र पसरले आहे. चिपळुणात कार्यालय असले तरी खेड, रत्नागिरी व अन्य तालुक्यांतही अनेकांनी यामध्ये पैसे गुंतविले आहेत.  काही दिवसांपूर्वी याच कंपनीत दोन लाख गुंतवा आणि शंभर दिवसांत 21 लाख कमवा, असे आमिष दाखवण्यात आले होते. चिपळुणातील काही भाजी व्यापारी, शासकीय कर्मचारी आणि विशेष म्हणजे तरुणांनी यामध्ये पैसे गुंतविले. व्याजाने पैसे घेऊन गुंतविलल्याने अनेकांनी अडचण झाली आहे. याआधी पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी बैठक घेतली व अशा प्रकारच्या कंपनीत पैसे गुंतवू नका. त्यामध्ये फसवणूकच होते, असे सूचित केले होते.