Fri, Aug 23, 2019 14:49होमपेज › Konkan › ‘ड्रिमलॅन्ड’ मुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन वैभवात भर पडणार

‘ड्रिमलॅन्ड’ मुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन वैभवात भर पडणार

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 10:36PMकुडाळ :  प्रतिनिधी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक ड्रीमलॅन्ड प्रकल्प असतो.  इलियास आदम शेख यांनी  पिंगुळी गोंधयाळेमध्ये साकारलेला  भव्य दिव्य ड्रीमलॅन्ड प्रकल्प पर्यटन सिंधदुर्गसाठी पूरक आहे. अशा प्रकारचे  पर्यटन प्रकल्प जिल्ह्यात ठिकठिकाणी  उभे राहिल्यास जिल्ह्याच्या पर्यअन वैभवात भर पडेल असे मत  आ. वैभव नाईक यांनी व्यक्‍त केले. 

कुडाळ- पिंगुळी- गोंधयाळे येथील ड्रीमलॅन्ड गार्डन रेस्टॉरंन्ट आणि वॉटरपार्कचा उद्घाटन सोहळा  बुधवारी आ. वैभव नाईक व सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते  करण्यात आला. जि.प. सदस्य  संजय पडते, ड्रीमलॅन्ड प्रकल्पाचे मालक इलियास आदम शेख,  माजी जि.प. अध्यक्ष विकास कुडाळकर, फिल्म प्रोडुसर साईनाथ जळवी, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, माजी पं.स. सदस्य अतुल बंगे, जिल्हा बँकेचे  कर्जव्यवस्थापक प्रमोद गावडे,  जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, प्रकल्पाचे मॅनेजर महेश पाटकर आदी उपस्थित होते. 

 आ. नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. किल्ले सिंधुदुर्गला प्रतिवर्षी जवळपास 4 लाख पर्यटक भेट देतात.  मात्र पर्यटकांनी किमान चार दिवस जिल्ह्यात थांबवे, असे ठिकाण जिल्ह्यात नव्हते. ड्रीमलॅन्ड गार्डनच्या माध्यमातून  पर्यटकांची ही गरज पूर्ण झाली आहे.  या गार्डनकडे येणार्‍या  रस्त्यासाठी येत्या सहा महिन्यात निधी उपलब्ध करण्याची ग्वाही आ. नाईक यांनी दिली.  

संजय पडते म्हणाले, पिंगुळी  मतदार संघात असे भव्य गार्डन निर्माण झाल्याने नजिकच्या काळात या भागाचा विकास झपाट्याने होईल. विकास कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्गच्या पर्यटनात इलियास शेख यांनी गार्डनच्या माध्यमातून मानाचा तुरा रोवून  गोवेरी गाव पर्यटन नकाशावर आणण्याचे काम केले.  अतुल बंगे व विद्याप्रसाद बांदेकर यांनीही प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.  इकबाल शेख, जमीर शेख, मौलाना खालीद, शपी शेख, माजी पं.स. सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी सरपंच राजन पांचाळ, दत्ता साळगांवकर, श्री. चौधरी आदीसह पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रास्ताविक साईनाथ जळवी यांनी तर निवेदन नागेश नेमळेकर. आभार मुश्ताक शेख यांनी मानले.