Sun, Jun 16, 2019 02:59होमपेज › Konkan › कर्जमाफीसाठी अन्य निधीवर डल्ला

कर्जमाफीसाठी अन्य निधीवर डल्ला

Published On: Feb 10 2018 11:16PM | Last Updated: Feb 10 2018 11:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या तीन महिन्यांत आदिवासी कोट्यातून 500 कोटी आणि मागासवर्गीयांच्या समाजकल्याणमधील कोट्यातून 1 हजार कोटी असे दीड हजार कोटींवर राज्य सरकारने डल्ला मारला, असा आरोप काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्‍ते डॉ.राजू वाघमारे यांनी केला. ते शनिवारी रत्नागिरीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत या अभियानाविषयी माहिती देताना डॉ. वाघमारे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी आदिवासी व मागासवर्गीय कोट्यातून घेतलेल्या निधीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आवाज उठविला. मात्र, सरकारला जाग आली नाही.  नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांदरम्यान परत आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या निधीतून प्रत्येकी 1 हजार कोटीघेतले. यामुळे अनेक दलित, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.