Mon, Jan 21, 2019 07:18होमपेज › Konkan › तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात पोलिसांचे संचलन

तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात पोलिसांचे संचलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना आणि चिपळूण कळंबस्तेमधील भीमस्मारकाची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी चिपळुणात संचलन केले. 

गेल्या काही दिवसांमध्ये खेड व चिपळूणमध्ये घडलेल्या प्रकारानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला होता. पोलिस व प्रशासनाने कुशलतेने या घटना हाताळल्या. त्यामुळे तणाव नियंत्रणात राहिला व शांततेचा भंग झाला नाही. कळंबस्तेही येथेही तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी तणावावर नियंत्रण मिळवले. अवघ्या दोन तासात भीमस्मारक नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतला. खबरदारीसाठी चिपळूण पोलिसांनी चिपळूण पोलिस ठाण्यापासून संपूर्ण शहरात संचलन केले. यामध्ये शीघ्र कृतिदलाच्या पोलिसांचाही समावेश होता.

Tags : Chiplun, Dr. Babasaheb Ambedkar statue disgrace issue 


  •