Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Konkan › भीमसैनिकांचा मोर्चा

भीमसैनिकांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

खेड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आणि चिपळूण तालुक्यात कळंबस्ते येथील भीम स्मारकाची तोडफोड केल्याप्रकरणी गुरुवारी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर भीमसैनिकांनी  मोर्चा काढला.  जिल्हा शासकीय रुग्णालय येथून निघालेल्या या मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्ग काही काळ बंंद ठेवण्यात आला होता. मोर्चा शासकीय रुग्णालय येथून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून निघाला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. 

मोर्चात बौद्धजन पंचायत समिती,  आरपीआय,  बौद्ध महासभा, भीम युवा पँथर, बोधिसत्व प्रतिष्ठान आदींसह डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित सर्व संघटनांनी सहभाग घेतला. बहुजन समाज पार्टी, बहुजन विकास आघाडी यासह शिवसेनेनेही  या  मोर्चाला पाठिंबा दिला होता.  यावेळी  शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले.

Tags : Dr. Babasaheb Ambedkar statue disgrace, Ambedkar activist, rally, Collector Office,


  •