Thu, Apr 25, 2019 16:21होमपेज › Konkan › कोकणातून धावणार्‍या डबल डेकरची चाकं थांबणार?

कोकणातून धावणार्‍या डबल डेकरची चाकं थांबणार?

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:34PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावर गेल्या दोन वर्षांपासून धावत असलेल्या वातानुकूलीत डबल डेकरचे 15 फेब्रुवारीपासून पुढील आरक्षण थांबवण्यात आले आहे. विकेंड तसेच विशिष्ट हंगामातच ही गाडी हाऊसफुल्‍ल धावत आहेत. त्यामुळे ही गाडी बंद करण्याची वेळ येणार का, अशी परिस्थिती आहे.

सुरुवातीपासूनच मध्य रेल्वे ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालवण्याबाबत उत्सुक नसताना लोकांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 6 डिसेंबर 2015 रोजी या गाडीला हिरवा 
झेंडा दाखवून ही गाडी कोकण तसेच गोवावासीयांसाठी कायमस्वरूपी सुरू केली होती. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या मांडवी, कोकणकन्या, तुतारी या एक्स्प्रेस गाड्यांसह मडगाव - सावंतवाडी-दिवा, रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाड्या सोडल्या तर उर्वरित सर्वच गाड्या या दक्षिणेतील राज्यांमधून भरून येत असल्याने गोवा तसेच कोकणवासीय प्रवाशांसाठी वातानुकूलीत डबल 
डेकर सुरू करण्यात आली.

या गाडीपाठोपाठ गेल्या वर्षी तत्कालीन रेल्वेमंत्री  सुरेश प्रभू यांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ ही देशातील पहिली सेमी हायस्पीड आलिशान रेल्वेगाडी मुंबई - करमाळी मार्गावर सुरू केली आहे. तेजस एक्स्प्रेसच्या आधीपासून लो. टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी डबल डेकरला गैरसोयीमुळे प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.