Tue, Mar 26, 2019 20:12



होमपेज › Konkan › कोकण रेल्वेचे दुपदरीकरण वेगात होणार 

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण वेगात होणार 

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:21PM



अलिबाग : विशेष प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असून ते तातडीने गतीमान करावे यासाठी कोकणातील खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते, खा. नारायण राणे, खा. विनायक राऊत यांनी आग्रही भूमिका मांडल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 140 किमीचे काम तातडीने गतीमान करण्याचे आदेश दिले. 

सुरेश प्रभ् रेल्वेमंत्री असताना या दुपदरीकरणासाठी  निधीची उपलब्धता करुन दिली होती मात्र त्यानंतरही काम मंद गतीने होते. बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयात   शनिवारी  कोकण रेल्वेच्या रखडलेल्या प्रश्‍नांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री अनंत गिते, खा. नारायण राणे, विनायक राऊत यांच्या समवेत रेल्वे भवनात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रशासनाला कोकण रेल्वे संदर्बातील रखडलेले प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आदेश देण्यात आले तसेच कोकणातील रेल्वे जात असली तरी कोकणातील प्रवाशांना जागा नसते तरी या मार्गावर लोकल गाड्यांची फ्रिक्‍वेन्सी वाढवावी अशा सूचना आल्या. प्रकल्प तातडीने नोकर्‍या तसेच रेल्वे स्थानकांवर सुविधा, रेल्वेतील खाद्य पदार्थांचा दर्जा वाढविणे यावरही यावेळी चर्चा झाली.  

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तिनही संसद सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे संवाद साधला. यावेळी कोकण रेल्वेशी निगडीत अनेक प्रश्‍नांवर चर्चा झाली. यामध्ये यामार्गावरील 140 किमी दुपदरीकरणाचे काम सध्या अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे ते मार्गी लावण्यात यावे अशी सुचना संसद सदस्यांनी केली. तसेच विद्युतीकरणाचे कामही वेगात करण्यात यावे याकडेही लक्ष वेधण्यात आले. कोकणात जाणार्‍या प्रमुख रेल्वे गाड्यांचे कोचेस वाढविल्यास या मार्गावरील प्रवाशांच्या दृष्टीने  ते सोईचे होवू शकते. ही संख्या तातडीने वाढविण्यात यावी. तसेच जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्या दादरवरुन सोडण्यात येतात मात्र येथे प्लॅटफॉर्मची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांनी अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे या गाड्या सीएसटी तसेच कुर्ला टर्मीनसवरुन सोडण्यात याव्यात अशी मागणी खा. विनायक राऊत यांनी केली आहे. 

रेल्वे प्रश्‍नासाठी विरोधक आले एकत्र

कोकण रेल्वे मार्गावरील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खा. नारायण राणे, विनायक राऊत हे विरोधक शनिवारी एकत्र आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने शनिवारी कोकण रेल्वे मार्गावरील संसद सदस्यांची वैठक रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या सुचनेनुसार आयोजित केली होती. यावेळी कोकण रेल्वे संदर्भातील प्रश्‍न तातडीने सोडवावे अशा सुचना केल्या.