Fri, Apr 26, 2019 15:32होमपेज › Konkan › दापोलीच्या खेळाडूंचा विश्‍वविक्रम

दापोलीच्या खेळाडूंचा विश्‍वविक्रम

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 9:38PMहातखंबा : वार्ताहर 

सलग सात तास रिले पद्धतीने उलटे स्केटिंग करून ईगल स्केटर्स क्लब दापोलीच्या खेळाडूंनी विश्‍वविक्रम रचला आहे. महाराष्ट्र रोलिंग स्केटिंग क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रतर्फे या स्पर्धा झाल्या. या विश्‍वविक्रमाची नोंद युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वज्र वर्ल्ड रेकॉर्ड या दोन संस्थांनी याची दखल घेऊन तसे प्रमाणपत्र दिले आहे.

मिरज येथील भानू तालीम संस्थेच्या क्रीडांगणावर झालेल्या या विश्‍वविक्रमात ईगल स्केटर्स क्लबचे महोमदजैद पठाण, अथर्व सावंत सफवान मुंशी, जयश देवकाते, शुभम नागरगोजे, स्वराली दळवी, कानन देवळे, आराध्या दांडेकर, श्रीराज रेवाळे, सृष्टी पाटील, शुभम पाटील  यांचा सहभाग होता. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रथमेश दाभोळे आणि प्रीति दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी टीम मॅनेजर म्हणून संदेश चव्हाण यांनी काम पाहिले. यशस्वी सर्व खेळाडूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.